शब्दांची विशेष ओढाताण न करता, नेहमीचेच शब्द वापरून चांगली बोधप्रद रचना झाली आहे.

संपून सर्व गेली दुःखाकडून दुःखे
माझ्याकडे व्यथेची ते मागतेय भिक्षा

असे हवे का? दुःख नपुंसकलिंगी असल्याने तसे मला वाटले. चू.भू.द्या. घ्या.

अवांतर :

सूर मागू तुला मी कसा
जीवना तू तसा मी असा

ह्यात जीवन नपुंसकलिंगी असूनही त्याला पुल्लिंगी विशेषण लावलेले आहे,  ते काही कारणाने की कवीचे स्वातंत्र्य म्हणून? शिवाय जीवन 'तसं' असे म्हणता येईल. पण नपुंसकलिंगी द्वितीय पुरुषी वाक्यरचनेत विशेषण एरवी कसे वापरता आले असते? जीवना, तू तसं ... असे काहीसे??