राजगुडे,
इथल्या तुसाँबाईच्या प्रदर्शनापेक्षा लंडनचे अतिशय भव्य प्रदर्शन आहे असे ऐकून आहे. बघू कधी योग येतो तो. अभिप्राय आवर्जून कळवल्या बद्दल आभार

सुधीर,
कौतुक व प्रोत्साहना बद्दल आभार

कुशाग्र,

शु. चि. आणि परिच्छेदाविषयी इतके संवेदनशील राहायला हवे असे नाही.

माझ्या मते मनोगतावरील शु. चि. इतका प्रभावी शु.चि. दुसरा कोठेही पाहण्यात नाही. तेव्हा मी दर लेखांतून खरंतर सगळ्यांना आठवण करू देत असतो की शु.चि. उपलब्ध आहे त्याचा वापर करून तर बघा!
दुसरं परिच्छेदाबद्दल: माझ्यामते लेखनात प्रत्येक वेगळ्या विषयाला, मुद्द्याला परिच्छेद असावा. जसा प्रवास करताना वळणांवर वेग कमी करणे श्रेयस्कर तसेच थोडे थांबून लेखनाला नवीन दिशा देणे मला तरी योग्य वाटते. हे लिहिणाऱ्यास आणि मुख्य म्हणजे वाचणाऱ्याला थोडा "दम" खाऊ देते असे माझे मत आहे (आग्रह नाही)

असो. बाकी प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार

इतर सर्व वाचकांचेही आभार

-ऋषिकेश