संपून सर्व गेली दुःखाकडून दुःखे
माझ्याकडे व्यथेची ते मागतेय भिक्षा

असे हवे का? दुःख नपुंसकलिंगी असल्याने तसे मला वाटले. चू.भू.द्या. घ्या.

वरील मताशी सहमत आहे. वरील ओळींत तुम्ही सुचवलेले  बदलही कानांना योग्य वाटतात.

सूर मागू तुला मी कसा
जीवना तू तसा मी असा

ह्यात जीवन नपुंसकलिंगी असूनही त्याला पुल्लिंगी विशेषण लावलेले आहे,  ते काही कारणाने की कवीचे स्वातंत्र्य म्हणून? शिवाय जीवन 'तसं' असे म्हणता येईल. पण नपुंसकलिंगी द्वितीय पुरुषी वाक्यरचनेत विशेषण एरवी कसे वापरता आले असते? जीवना, तू तसं ... असे काहीसे??

मला वाटतं वरील ओळींत कवीने जीवनाचे परसॉनिफिकेशन (मराठीत मानुषीकरण?) केलेले आहे. कवीचे स्वातंत्र्य म्हणता येणार नाही. परसॉनिफिकेशन केल्यावर लिंगबदल होतो.
उदा.: आपण गाढवाला आपण 'ते गाढव' म्हणतो. पण एखाद्याला आपण जेव्हा "गाढवा, तुला एवढीही अक्कल नाही!" असे म्हणतो, तेव्हा तिथे गाढवाचे मानुषीकरण झालेले असते. अशावेळी अशा शब्दांना लावण्यात येणाऱ्या विशेषणांचे लिंगदेखील बदलेल. उदा.: तू भलताच/भलतीच गाढव आहेस. चुभूद्याघ्या.

परसॉनिफेकशन हा एक अलंकारच आहे. कवी आकाशाला, फुलांना, झाडांना अरेतुरे म्हणून संबोधत असतोच.
उदा. :
रंग माझा तुला गंध माझा तुला
बोल काहीतरी बोल माझ्या फुला

लाजऱ्या माझ्या फुला रे गंध हा बिलगे जिवा
अंतरीच्या स्पंदनाने अन्‌ थरारे ही हवा


दुःखाकडून दुःखे मधील दुःखाकडून हे दुःखाचे परसॉनिफेकशन असल्यास मात्र तो योग्य. पण तरीही कानांना सवय नसल्यास दुःखाचे असे परसॉनिफेकेशन कानांना खटकू शकते.