मानुषीकरण केल्यावर त्या गोष्टीशी बोलणे आले. (नाहीतर कशाला उगाच मानुषीकरण करण्याची वेळ येणार!) अडचण अशी आहे की बोलताना द्वितीय पुरुषी एकवचनी संबोधनाचा (तू) वापर करते वेळी केवळ पुल्लिंगी वा स्त्रीलिंगी गोष्टच संबोधित केली गेल्याचे कल्पिलेले आहे. व्यवहारात केवळ पुल्लिंगी वा स्त्रीलिंगी गोष्टींनाच संबोधणे अनुभवास येत असल्याने द्वितीय पुरुषी एकवचनाचा नपुंसकलिंगी वापर अपरिचित आणि म्हणूनच अकल्पित असावा. विशेशतः त्या गोष्टीला मराठी विशेषण लावायचे असेल तरच ही अडचण (आहे असे) जाणवते, कारण मराठी विशेषणे लिंगसापेक्ष असतात. उदा.

'जीवना तू मोठा आहेस.' असे म्हणताना ती अडचण जाणवेल; पण 'जीवना तू महान आहेस' असे म्हणताना जाणवणार नाही.