१. आपाद = पायापर्यंत + मस्तक = डोक्यापासून पायापर्यंत. शाळेत मला अकरावीपर्यंत संस्कृत होते. तेव्हा असे शिकल्याचे आठवते.

२. कौटिल्य नव्हे कौटल्य. कुटल कुलोत्पन्न यः, सः कौटल्य. असा या संधीचा विग्रह आहे. म्हणजे कुटल कुळांत वा गोत्रांत जन्मलेला.

३. गोरसदोहन हा शब्द कथाकाळाला अनुसरून वाटला.

चोखंदळ वाचक जरुर त्रुटी दाखवितील. पण नाउमेद होऊं नये. सुरुवात तर अप्रतिम झाली आहे, भाषा आवडली. एकंदर लेखमाला गाजणार असे वाटते. 

पु ले शु