१.त्यांच्या वाढीवर परिणाम होतो हे दिसून आले आहे. हे आपल्या डॉ. जगदीशचंद्र बोसांनीच दाखविले आहे. परंतु आपल्या गुलामी वृत्तीला अनुसरून जर गोऱ्या माणसाने वा शास्त्रद्नाने सांगितले तरच आपल्याला ते खरे वाटते.

२. गाणे ऐकून मेंदुवर झालेला परिणाम शरीरात  काय बायोकेमिकल बदल घडवून आणतो यावर ते कदाचित अवलंबून असेल. या गोष्टीवर संशोधन झाले तरी विविध औषध कंपन्या त्याविरुद्ध प्रचार आघाडी उघडतील व हे संशोधन खोटे ठरविण्याचा प्रयत्न करतील. संगीत नक्कीच मानसिक दबावामुळे (न्युरोटिक अथवा नॉनसायकॉटिक) निर्माण होणारे उच्च रक्तदाब, औदासिन्य, अतिकाळजीजन्य औदासिन्य (अँटिसिपेटरी अँक्झायटी) इ. रोगांवर गुणकारी आहे. माझा स्वतःचा अनुभव असा. कौटुंबिक कारणामुळे माझे शिक्षण एफ वाय सायन्स नंतर एक वर्ष तात्पुरते खंडित झाले होते. तेव्हा मला प्रचंड औदासिन्य आले होते. देवावर विश्वास नाही. त्यामुळे कोणताही मानसिक आधार नाही. बेकार बसून काय करणार म्हणून व्यायाम करण्यास व शास्त्रीय संगीत शिकण्यास सुरुवात केली. औदासिन्य पार पळून गेले आणि जगण्याला एक नवी उमेद प्राप्त झाली न्व्हे संजीवनी मिळाली. नाहीतर व्यसनी होऊन कुठेतरी अंडर्वर्ल्डमध्ये गेलो असतो. औषधाच्या दुकानात संध्याकाळी तासभर उभे राहिल्यास रक्तदाबावरील औषधांचा खप किती आहे ते कळेल.

टीप.: न्यूरॉसिस या नावाचे आजार भावनिक असतात. परंतु मेंदूतील जीवरासायनिक क्रियेत बिघाड नसतो. परंतु लक्षणे १०० टक्के खरी असतात व औषधउपाययोजनेची जरूर असते. सायकॉसिस या प्रकारात मेंदूतील जीवरासयनिक क्रियेत बिघाड असतो. यावर संगीत उपचार पुरेसा नाही. हा फरक मेंदूच्या विद्युत आलेखात (ई ई जी = इलेक्ट्रो एन्सेलोग्राफ) कळतो.