सुधीर,
तुमच्या माहितीबद्दल तसेच स्वतचा ह्याविषयीचा अनुभव येथे दिल्याबद्दल धन्यवाद.
पण माझे दोन प्रश्न आहेत तेः
१. मारव्याचे सूर कुणा अशा व्यक्तिला, जिचा भारतीय मातीशी, संस्कृतिशी काहीही संबंध नाही, का 'करूण' भासावेत? ह्याविषयीची चर्चा नुकतीच होऊन गेली. ती इथे बघाः
२. संगीताचा वनस्पतिंवर तसेच मानवावरही परिणाम होतो, हे ऐकून माहित आहे. पण ह्याविषयी काही ठोस माहिती मिळाल्यास बरे होईल. माझा प्रश्न येथे उल्लेखिलेल्या विशिष्ट घटनेबद्दल आहे. पं. ठाकूरांनी मुसोलिनीचा निद्रानाश संगीताच्या सहाय्याने दूर केला, ह्यात कितपत तथ्य आहे?
आपल्या गुलामी वृत्तीचा तसेच औषधी कंपन्यांच्या प्रचाराचा आपल्या ह्या चर्चेशी काही संबंध नसावा.
---प्रदीप