'शून्य' ही मी लिहिलेली आणि शिवम प्रकाशन पुणे यांनी प्रकाशीत केलेली (जुन 2007) एक सस्पेंस थ्रीलर कादंबरी आहे.
या कादंबरीचे वैशिष्ट म्हणजे या कादंबरीत आजच्या गणिताच्या दृष्टीने आणि आजच्या एकूण प्रगतीच्या दृष्टीने महत्वाची असलेल्या शुन्याचा शोध या घटनेचा आढावा घेण्यात आला आहे. शुन्याचा शोध हा प्राचीन भारतीय गणितज्ञ आणि ऋषीमुनींनीच लावला असला पाहिजे या गोष्टींचे पुरावे आणि प्राचीन भारतिय इतिहासात शुन्याचा शोध कसा लावला गेला असेल या गोष्टीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या कादंबरीत केला आहे. त्याचवेळी या कादंबरीला वाचकांच्या दृष्टीने मनोरंजक आणि वाचनीय करण्यासाठी तीला अमेरीकन भूमीवर घडणाऱ्या एका रहस्यमय आणि चित्तथरारक कथेत गुंफले आहे.
ही कादंबरी आता मी ब्लॉग च्या स्वरुपात रोज एक भाग या प्रमाणे खालील संकेत स्थळावर प्रकाशीत करीत आहे...