टिकाऊ, टिकाऊपणा, संधारण शब्द वापरून पाहिले, पण ते सर्वच ठिकाणी चपखल बसत नाहीत.

सस्टेन मध्ये मला वाटते 'असलेली स्थिती धारण केल्यानंतर ती पुन्हा खालच्या स्तरावर जाऊ नये' (टिकवून ठेवणे) असा अर्थ असावा. पण त्यात वरच्या पातळीवर जाणे अपेक्षित असू शकते. सस्टेनेबल ग्रोथ मध्ये  वाढीमध्ये सातत्य अपेक्षित आहे पण वाढ कमी होता कामा नये. स्थिरस्थायी शब्द योग्य वाटतो, पण त्यातही ही छटा येत नाही असे वाटते. 

पर्यावरणीय संगोपनीयता शब्द आवडला.