एकता कपूर च्या मालीकांमध्ये अगदी प्रमाणाबाहेर, अजीर्ण होईल ईतके विवाहबाह्य संबंध दाखवले जातात. त्यामुळे तो काळ आता दूर नाही की मालिकांची नावे खालील प्रमाणे असतील :
एकता कपूर स्पॉन्सर्ड एग्झाम पेपर (परीक्षा) :
प्रश्न १ : योग्य पती निवडा व योग्य पत्नी शी जोड्या लावा
प्रश्न २ : खाली दिलेल्या नायिकांची दुसरी लग्ने कधी झाली, कशी व का मोडली ते एका वाक्यात स्पष्ट करा. एका वर्षाच्या आत दोन लग्न केलेल्या नायिका किती ?
प्रश्न ३ : एका जन्मात सात लग्ने, तर एकूण फेऱ्यांची संख्या किती?