डान्सबार बंदीसंबंधीचा वाद आता सर्वोच्च न्यायलयात गेला आहे. तेथे निर्णय काय व कधी लागतो त्याचा काही नेम नाही. मुंबई उच्च न्यायालयाने डान्सबार वरील बंदी उठवली असे जे आपण म्हटले ते चूक आहे. बारमधील डान्स आजही बंदच आहेत!
डान्सबार बंद झाल्यावर त्या सगळ्या मुली वेश्याव्यवसायात येतील आणि मुंबईचे सामाजिक स्वास्थ्य बिघडून जाईल असे चित्र काही मंडळी (काही इंग्रजी वृत्तपत्रे यात सामील होती) रंगवीत होती. परंतु, तसे काहीही झाल्याचे दिसले नाही. मूळात ७५००० ही संख्याच फुगवलेली होती. एकूण संख्या ३५-४० हजार इतपत असावी. डान्स बंद झाल्यावर त्यातील काही मुली आपापल्या गावी परत गेल्या, काहींनी बंगलोर, हैदराबाद, दुबईचा रस्ता पकडला. जेव्हा ज्यांना योग्य असा पर्याय मिळाला तो त्यांनी स्वीकरला. थेट वेश्याव्यवसायात आलेल्या डान्सगर्लची संख्या खूपच कमी!
एक निश्चित, की कुठलीही मुलगी आपणहून, आनंदाने या व्यवसायात आली नाही वा टिकली नाही. घरची गरीबी, अत्यल्प (वा अजिबात नसलेले) शिक्षण, अवलंबून असणाऱ्यांची मोठी संख्या हेच सर्वांचे कारण आहे/होते.
डान्सबार ही मुंबईची सामाजिक गरज अजिबातच नाही. त्यामुळे ते सुरू न झाले तरी बहुसंख्य समाजाचे काहीही बिघडणार नाही. सध्याच्या मुलींना अन्य रोजगार मिळेल असे सक्षम करणे (बहुसंख्य मुलींनी ते अगोदरच केले आहे) आणि नव्या कोणाला या व्यवसायत न आणणे, हे केले तर डान्सबार संस्कृती मुंबईत पुन्हा येणार नाही!