हे तुझे हासणे गं, मला पाहताना

प्रेम जर नव्हे तर अजून काय आहे?

परका मला म्हण तू, वा म्हण दिवाणा

हृ्दयाची गम्मत वेडा ओळखून आहे

भावना मनी एक, दुसरा बहाणा

प्रेम जर नव्हे तर अजून काय आहे?

विचारात हरवून सखये असशी सदा तू

जशी जागती मूर्ती चित्रकार  पाहे

लाडिक नखरे नजर कविची परंतु

प्रेम जर नव्हे तर अजून काय आहे?

- बहुगुणी