ओंकार, लेख इथे दिल्याबद्दल अनेक धन्यवाद.
मला वाटते सध्या जागतिक पातळीवर असलेल्या समस्यांनध्ये ही समस्या अत्यंत महत्वपूर्ण आहे. दुर्दैवाने सध्याच्या अमेरिकन प्रशासनाला याचा गंधही नाही. मागे बाली येथे झालेल्या परिषदेमध्ये प्रस्तावाला विरो्ध करणारा अमेरिका हा एकमेव देश होता. शेवटी पापा न्यू गिनीच्या सदस्याने अमेरिकन मंडळाला सुनावले की तुम्हाला यात सहभागी व्हायचे नसेल तर बाजूला व्हा. आता अमेरिकेतील राज्यांना याची गंभीरता कळाली आहे. कॅलिफोर्नियाने अमेरिकन प्रशासनावर या बाबतीत खटला दाखल केला आहे. अल गोर म्हणतात त्याप्रमाणे अतिरेक्यांच्या हल्ल्याव्यतिरिक्त आणखी गंभीर समस्याही आहेत.
बाकीच्या जगातही चित्र भयानक आहे. सध्या अंटार्टिकेमध्ये जपानी जहाजे एका मोहीमेवर आहेत. ही मोहीम आहे १००० आरक्षित व्हेल माश्यांची शिकार करण्याची. जपानचे म्हणणे आहे की हे त्यांच्या ’संशोधनासाठी’ आहे. ग्रीनपीस संघटनेची बॊट या जहाजांचा पाठलाग करून त्यांना रोखण्याच्या प्रयत्नात आहे.
आपण काय करू शकतो?
हॅम्लेट