आभारी आहे. मला वाटलं होतं की माझी लिहिण्याची स्टाईल (तिला शैली म्हणताना मला ओशाळल्यासारखं वाटतं) आवडेल की नाही वाचकांना. निदान वाचण्यासारखं तरी वाटेल का माझं लिखाण?(ते 'लेखन' नाही हो, 'लिखाण'च आहे). पण तुमचा प्रतिसाद वाचून हुरूप आला.
डोक्यापासून पायापर्यंत न्याहाळणे योग्य की पायापासून डोक्यापर्यंत न्याहाळणे योग्य?
मला वाटतं डोक्यापासून पायापर्यंतच बरोबर आहे. चित्रपटांमध्ये जरी पायापासून डोक्यापर्यंत कॅमेरा फिरवतात (आपादमस्तक), तरी प्रॅक्टिकल लाईफ मध्ये आपण आधी समोरच्याचा चेहरा पाहतो. त्याबद्दल अधिक उत्सुकता असते. मग नंतर त्याचा वेष पाहतो. असो, कदाचित काही जणांचा क्रम उलटाही असेल. तूर्तास त्या गृहस्थाचा क्रम हा माझ्यासारखाच होता असं ऍझ्यूम करायला हरकत नाही, नाही का?