चाणक्य मालिकेबद्दल म्हणावं तर तुम्ही म्हणताय ते खरं आहे. पण तेच प्रमाण का मानावं?
माझा ह्याविषयावर अभ्यास फार नाही. आत्ता तो चालू आहे. काही संदर्भ मी वाचले. त्यात एकवाक्यता नाही. कदाचित कादंबऱ्यांमध्ये लेखकाने तेवढी सूट घेतली आहे.
माझं लिखाण हे काही ऐतिहासिक दृष्ट्या १००% बरोबर असेल असं नाही. किंबहुना तसा दावा कोणीच कथालेखक करू शकणार नाही. एका माहीत असलेल्या इतिहासाबद्दल आणखी चार लोकांना उत्कंठा निर्माण करावी, निदान काहीतरी नवीन वाचायला द्यावा ह्या (उघड) आणि (स्वतःची पाठ थोपटून घ्यावी ह्या छुप्या) उद्देशानं निहिलेली ही कथा आहे हे प्रांजळपणे नमूद करतो. तो उद्देश तडीस नाही गेला तरी हरकत नाही, तुम्हाला वाचायला चांगलं वाटलं एवढ्यातच मला समाधान आहे.