मुक्ता,
ह्यातील आशय हा एखाद्या कवितेला जास्त ’सूट’ व्हावा,,(चु.भु.द्या.घ्या.) तसेच गेयता आणि वृत्ताच्या दृष्टीने काही ठीकाणी ओघवती वाटली नाही... काही बदल केले आहेत..बघा कसे वाटतात ते?..तसेच ’मक्ता’ आशयाच्या दॄष्टीने नीटसा स्पष्ट होत नाही.... पण एकूण शब्दांतील आशय अतिशय सुंदर!!!!
शब्दांची वारुणि आज मी, ही रिचवत गेले.
ओठातून मी आज ते जणू वेद वदत गेले.
मला न कळले धुंदी ऐसी, चढली हो मजला,
वेदांनाही सुरात माझ्या मी सजवत गेले.
मंत्र ऋचा मी अशा गायल्या आज मन्मनीच्या,
प्राणमौक्तिके श्वास-सुतातून, जणू मढत गेले.
’मुक्तात्म्यातून’ आता भिनली, अशी वेद वाणी
आत्मा सोडोनी शरीर कुणाचे, बघा जळत गेले(?)!!
ह्या ही पेक्षा अधिक चपखल रचना होऊ शकेल..
-मानस६