सुधीरजी, आपण समासाचा विग्रह केला आहे, संधीचा नव्हे. दुसरं असं की आपादमस्तक याचा अर्थ पायापासून डोक्यापर्यंत असाच मलातरी बरोबर वाटतो.
जेव्हा आपण आबालवृद्ध म्हणतो तेव्हा बालांपासून वृद्धांपर्यंत असाच अर्थ अपेक्षित असतो. अजून उदाहरणं म्हणजे आमरण आणि आजन्म. म्हणजे मरण येईपर्यंत व जन्म संपेपर्यंत.
आमरण चा विग्रह मी तर संस्कृत शिकताना मरणात आ म्हणजे मरणापर्यंत असाच करत असे.
हे मान्य करा नाहीतर मी आमरण उपोषणाला बसतो.