केल्याबद्दल धन्यवाद. समीक्षण खूपच आवडले आणि हा चित्रपट बघितलाच पाहिजे असे मी ठरवून टाकले, बघू कसे जमेल ते.

<<दुसरं म्हणजे डुरक्याचे पात्र फारच अंडरप्ले करुन रंगवल्यासारखे वाटते. डुरक्याच्या विध्वंसांचे केवळ अवशेष दिसत राहतात. पण प्रत्यक्ष हल्ला करणारा डुरक्या कधीच दिसत नाही. त्याचा हिंस्रपणाही केवळ एकदोन डुरकावण्यांमधूनच ऐकू येतो>>

ह्यात कदाचित दुहेरी हेतू असावा. एकतर असे हे कथानायकाला पडद्याआड ठेवणे हे चित्रपटाच्या मांडणीच्या दृष्टिने वैशिष्ट्याचे आहे. दुसरे कारण म्हणजे असे करणे हे सोईचेही आहे. एखादा धष्टपुष्ट वळू त्या गावात नेणे व तिथे त्याच्याकडून 'अभिनय' करून घेणे हे अत्यंत जिकिरीचे ठरले असते.

हा चित्रपट धंद्याच्या दृष्टिने यशस्वी होईल अशी आशा करूया.