कुटल कुलोत्पन्नः  ही कौटल्यची व्युत्पत्तीच असावी बहुधा! माझ्या दुर्दैवाने शाळेत संस्कृत शिकत असताना माझ्यापाशी असलेली अतिशय सुमधुर तसेच काही विनोदी सुभाषिते, व्याकरणाबाबतची माहिती माझ्यापाशी नाही. गुण मिळवण्यासाठी संस्कृतचा उपयोग करून मी संस्कृतला विसरत चाललोय असं खेदाने म्हणतो. ही माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात आहे आणि जर माहिती मिळालीच तर एक अतिशय सुंदर लेखमाला मनोगतवर देता येईल यात काही संशय नाही.