ह्या समासाचा तुम्ही केलेला विग्रह चुकीचा आहे. 'आपादमस्तक' म्हणजे पायापासून डोक्यापर्यंत हेच बरोबर आहे. 'आसेतुहिमाचल' म्हणजे सेतूपासून हिमाचलापर्यंत. आमरण म्हणजे मरणापर्यंत हे बरोबर आहे, पण नेहमी सुरुवातीला 'आ' आला म्हणजे त्याचा अर्थ 'पर्यंत' च होतो असं काही नाही. तुम्ही म्हणता तसा अर्थ 'आजानुबाहू' या शब्दात आहे (गुडघ्यापर्यंत हात), पण तो एक प्रकारचा तत्पुरुष समास आहे (दुसऱ्या शब्दाबद्दल माहिती सांगणारा शब्द... बाहूंबद्दल वर्णन केलं आहे). पण आपादमस्तक हा बहुव्रीही आहे. तो तत्पुरुष समजून सोडवल्यास त्याचा अर्थ 'पायापर्यंत असलेले मस्तक' असा होतो.

'आसेतुहिमाचल'ही बहुव्रीही आहे. 'सेतुपासून हिमाचलापर्यंत आहे असा तो' असा त्याचा विग्रह होतो.

'आबालवृद्ध' याचा अर्थ 'बालकांपासून वृद्धांपर्यंत' असा होतो. 'वृद्धांपासून बालकांपर्यंत' असं कोणी म्हणणार नाही, नाही का?