आपण मुलांना वाढवून मोठे केले व शिक्षण दिले म्हणजे आपले कर्तव्य संपले. त्यापुढच्या भविष्याची चिंता करू नये. त्यांचे निर्णय त्यांना घेऊ द्यावे. निर्णयाचे चांगले-वाईट परिणाम भोगण्याची जबाबदारी त्यांची आहे. तसेच म्हातारपणी मुलगा आपल्याबरोबर राहील अशी अपेक्षा अजिबात ठेवू नये.