आपले हे परीक्षण बेहद्द आवडले.'वळू'ची जाहिरात टीव्हीवर पाहून उत्सुकता चाळवली होती. हे परीक्षण वाचून चित्रपट पाहण्याची इच्छा बळावली आहे.

मराठी चित्रपटसृष्टी पुन्हा एकदा बहराला येत आहे. वेगळ्या विषयांवरचे टवटवीत चित्रपट येत आहेत.हे पाहून आणि वाचून आनंद होतोय.
पण हाय! माझ्यासारख्या अमराठी मुलुखात रहाणाऱ्या मराठी माणसाला मात्र ते बघता येत नाहीत याचे दुःख आहे.
या चित्रपटाची डीव्हीडी निघते आहे काय?