पुस्तकाची किंमत किती? जालावर विकत मिळेल का?

आवली की अवली? नक्की नाव काय आहे? शिवाय तिचे नाव जिजाबाई असे होते पण तिला तिच्या कजागपणामुळे 'अवली' असे लोक म्हणू लागले असे मी कोठेतरी ऐकलेले आहे. चू भू. द्या. घ्या.

... काहीही धागा इतिहासात नाही. हा इतिहासाचा करंटेपणा की आवलीच दुर्भाग्य? केवळ इतक्या त्रोटक माहितीवर संपूर्णपणे लेखिकेने उभं केलेलं काल्पनिक विश्व, ... हे काल्पनिक चरित्र आवलीला न्याय मिळवून द्यायला थोडी तरी मदत करू शकेल.

काल्पनिक चरित्र मूळ व्यक्तीला न्याय कसे देणार?  आवलीची (की अवलीची?) बाजू मांडण्याचे काम उत्कटपणे केलेले आहे असे म्हणता येईल फार तर.

अवांतर : लिहिताना फार गिचमीड झाल्यासारखी वाटते. नीट परिच्छेद पाडलेले नाहीत. काही ठिकाणी चुकीच्या जागी पाय मोडलेले आहेत. (विठ्ठल्-रुक्मिणीच्या साधकापासून्-सिद्धावस्थेपर्यंत) ऱ्या ऐवजी 'होणा-या' असे काही लिखाण एरवी सुंदर असलेल्या लेखात रसभंग करते.