मी बराच वेळ परदेशात राहिलो आहे आणि अनेक दोस्तांचे हायब्रीड संसार अनुभवले आहेत. मला नेहमी हा प्रश्न पडतो की जर पाश्चात्यांचा पैसा चालतो, त्यांच्या सोयीसुविधा चालतात, त्यांनी शोधलेले विज्ञान चालते तर मग त्यांच्या मुली आणि संस्कृती का नाही चालत.

भारतीय संस्कृतीचे गोडवे गाताना याचा कसा विसर पडतो की आपल्याला ( किंवा आपल्या मुलांना ) देश सोडावा लागला कारण आपल्या आकांशा आणि स्वप्ने यांना तेथे काहीच जागा नव्हती.

मी आता कायमचा भारतात परत जातो आहे पण जाताना या लोकांबद्दल आदर घेऊन जातो आहे.