प्रिय द्वारकानाथ नि बन्या,
तुम्ही म्हणता ते खरं तर आहे, पण तो सोयीस्कर वा ओघानेच येणारा (ऑबव्हिअस) नि लांबचा आदर्शवादी निष्कर्ष आहे. किंवा तिथून सुरूवात करावी लागेल म्हणू. वनवासी भागात रोजगार सुधारला तर वनवासी लोकांमधून नक्षलवादी बनणं कमी होईल असं आपण म्हणू शकतो, पण वनवासी लोकांमधून नक्षली गँगमध्ये सहभागी होणाऱ्यांची संख्या नगण्य आहे म्हणतात.
वरच्या घटनेत उल्लेखलेलं नरमांसभक्षणाचं उदाहरण प्रातिनिधिक आहे. याच तोलामोलाचे कार्यक्रम हे नक्शलवादी केवळ दहशत बसवण्यासाठी म्हणून करत असतात. पोलिसांशी खडं वैर पत्करून हे करायला धजणाऱ्या टोळ्याच्या टोळ्या निर्माण करणं; यासाठी आजूबाजूच्या लहान मोठ्या कसब्या-शहरांतून तरूण तरूणींची भरती करवून घेणं, राजकीय नेतृत्त्वाला, माध्यमांना न जुमानता हे सगळं वर्षनुवर्षे अव्याहत सुरू ठेवणं नि भारतवर्षाच्या एका मोठ्या पट्ट्यामध्ये आपलं साम्राज्य निर्माण करणं हे सगळं करण्यासाठी सशक्त संघटनेची गरज आहेच आहे हे मान्य करायला हवं. म्हणूनच नक्षलवादाचा सामना वैचारिक पातळीवरही करावा लागेल.
त्यांना मिळणारं आधुनिक युद्धशास्त्रीय डावपेचांचं लष्करी प्रशिक्षण, अद्ययावत शस्त्रास्त्रे आणि पैशाचं पाठबळ यांमागे परकीय हात आहे हेही निस्संशय.
आजची स्थिती पाहता असं जाणवतं की माध्यमांनी नि सरकारने या प्रश्नाच्या व्यापकतेबद्दल, भयावहतेबद्दल नि कारणांबद्दल 'झाकून ठेवण्याचं' धोरण स्वीकारलं आहे. याचं मला जाणवणारं कारण मूळ प्रश्नाइतकंच भयंकर आहे. 
जागरूक मनोगतींपैकी कुणाकुणाला कायकाय वाटतं हे अवश्य लिहा ...