माझ्या माहिती प्रमाणे,, पुणे विद्यापीठात जवळ जवळ ७०० महाविद्यालये आहेत (स्त्रोत : पुण्याच्या नवनिर्वाचित "कुलसचिव" यांबरोबर मारलेल्या गप्पा  अहो आमच्या गावचेच आहेत ते !) ... हा... तर अशा या ऐसपैस आणि भव्य विद्यापीठात ([link=www.unipune.ernet.in]हे विद्यापीठाचे संकेतस्थळ[/link]) खुप महाविद्यालये एच आर चे शिक्षण एम.बी.ए या अभ्यास क्रमा अंतर्गत देतात... (पण सगळीच महाविद्यालये डोळे दिपवून टाकणारे पगार असलेली नोकरी देउ शकत नाहित.) त्यासाठी [link=http://pagalguy.com]येथे[/link] जाउन अशा महाविद्यालयांची माहिती व ratings माहित करून घ्यावेत. तसेच पुण्यातील काही महाविद्यालयांसाठी व संपुर्ण महाराष्ट्रातील  महाविद्यालयात शिकवल्या जाणार्या एम.बी.ए अभ्यास्क्रमाची  प्रवेश परीक्षा सी ई टी फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येते. त्यासाठी १८ जानेवारीपासुनच प्रवेश अर्जांची विक्री सुरू झाली आहे. प्रवेश अर्जाची किंमत रु.११५० असून पोस्ट ओफिस मध्ये मिळतो. अधिक माहिती साठी महाराश्ट्र शासनाच्या अधिकृत [link=http://dte.org.in/mba/default2007.asp]एम.बी.ए[/link] या संकेत स्थळास अवश्य भेट द्यावी. एम.बी.ए. प्रवेश परीक्षेसाठी साठी चांगला खाजगी क्लास मला आय.एम.एस हा वाटतो