सर्वप्रथम या बातमीबद्दल सागर यांचे आभार! आणि साऱ्या भारतीयांचे अभिनंदन!
मेघनाद आणि नरेंद्र,
हा निव्वळ व्यापार आहे. भारताने एका व्यापारी तत्त्वावर हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. जर इस्त्रायलने हा उपग्रह भारताऐवजी दुसऱ्या देशातून सोडला असता आणि मग भारतावर हेरगिरी केली असती तर चालेल असे म्हणायचे आहे का? तेव्हा हेरगिरी आणि हे प्रक्षेपण ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. इस्त्रायल उपग्रह सोडणारच होता. आपण उत्तम व्यापारी तत्त्वांचा वापर करून हे 'काँट्रॅक्ट' मिळवले हे किती अभिमानास्पद आहे.
राहता राहिला प्रश्न इराणचा. नव्या बदलत्या परिस्थितीत इराण सारख्या दुबळ्या मित्राची गरज किती आहे? मात्र इराणला भारतासारख्या भक्कम "ग्राहकाची" गरज कितीतरी पटीने अधिक आहे. काहीही झालं तरी इराणला भारताशी संबंध बिघडवून घेणं परवडणार नाही. इराणच काय पण भारताचे आंतरराष्ट्रीय स्थान पाहता हे आता कोणालाही परवडणारं नाही. (अगदी इराक विरुद्ध मतदान करून, इराण गॅस पाईपलाईनला बासनात बांधूनही अरब राष्ट्रे काहीही करू शकत नाहीत कारण भारत हा त्यांचा भावी सर्वात मोठा ग्राहक असेल)
तेव्हा "भारताने उपग्रहाच्या व्यापारी उड्डाणाच्या व्यवसायात यशस्वी उड्डाण केले आहे असेच म्हणावे लागेल." हे पटले.
आगे बढो टीम इंडिया!! शुभेच्छा!
-ऋषिकेश