एका हुषार पण दिसायला ठीक ठीक माणसाकडे एक दिसायला सुंदर पण किंचित खुळी अशी बाई जाते. ती त्याच्यावर भाळलेली असते. ती त्याला म्हणते, की तुम्ही माझ्याशी लग्न करा.
तो म्हणतो, "का?" 
ती म्हणते, "माझी खूप इच्छा आहे तुम्ही माझ्याशी लग्न करावं, अशी.  शिवाय, लग्नामुळे होईल काय की, आपल्याला होणारं मूल माझ्यासारखं सुंदर आणि तुमच्यासारखं बुध्दिमान होईल." 
तो म्हणतो, "कल्पना चांगली पण उलट झालं तर पंचाईत !

हा विनोद मी अब्राहम लिंकन यांच्याबाबत ऐकला होता. विनोदातील माणूस म्हणजे लिंकन.