उपग्रहनयन हा शब्द नौकानयन ह्या शब्दावरून बेतला काय? मला उपग्रहवहन हा शब्द अधिक योग्य वाटतो
बरोबर. नयन आणि वहन दोन्ही शब्द मी मनात आणून पाहिले; लाँच म्हणजे सोडणे किंवा पाठवणे अशा अर्थी काय म्हणावे ते नीट ठरले नाही. लेख समयोचित होणे हाही महत्त्वाचा मुद्दा असल्याने त्यावर जास्त रमलो नाही.
तुम्ही ह्यात रस घेतला हे चांगले झाले. तुम्हीही सध्या चालू असलेल्या वैज्ञानिक गोष्टींबद्दल असे काही लिहावे, म्हणजे आणखी इतरांनाही लिहावेसे वाटेल. आणि चांगली चर्चा होईल.