अचूक परिचयासाठी. एकाच नावाची दोन माणसे असू शकतात. तुमच्या कार्यालयातच संदीप पाटील नांवाची आणखी दोन मुले आहेत. पैकी एक आमच्या चि. चा नर्सरीपासूनचा मित्र आहे. एकाच नावाची दोन माणसे एकाच गावात असल्यामुळे एकाने केलेल्या गुन्ह्याबद्दल दुसऱ्याला अटक झाली होती ही एक सत्यघटना आहे. व त्यावर एक सिनेमाही आला होता.
असो. परंतु जातपात आस्तित्त्वात नसावी हे मात्र खरे. जातच काय धर्मही नसावे. देव आणि धर्म या दोन्ही संकल्पना निसर्गनिर्मित नसून पुर्णत: मानवनिर्मित आहेत. एक धर्म जर मानवकल्याणार्थ असेल तर दुसऱ्या धर्माची आवश्यकता भासली आणि स्थापना कां झाली? जातिधर्म नसते तर मानवाचे कल्याणच झाले असते. आजवर युद्धात जेवडी माणसे मेली नस्तील त्यापेक्षा कित्येक पटीने जातीय दंगलीत मारली गेली आहेत. देवाच्या आस्तित्त्वाच्या कल्पनिक कुबड्यांमुळे माणूस भावनिक दृष्ट्या कमकुवत झाला आहे.