ताजमहाल काय, पिरॅमिड्स काय अथवा एम्पायर स्टेट काय.. ही स्थापत्ये घडवताना दगड-विटा, संगमरवर, शिलाखंड याहिपेक्षा जास्त काहीतरी वापरले गेले, आणि ती गोष्ट होती मानवी महत्त्वाकांक्षा.

अगदी खरे.

या रिमोटवर शीड वळवणे, होडी वळवणे आणि होडी चालू-बंद करणे इतकीच नियंत्रणे असतात. हवा नसताना ही होडी चालवणे सोपे असावे असा समज असल्याने तेव्हा चालवून पाहिली पण कमी हवे मुळे कमी वेग आणि कमी वेगात असल्याने अचानक वारा आला तर कलंडेल म्हणून जास्तच नियंत्रण ठेवावं लागे.

खरी होडी चलविणे पण कठीण आहे. एकदा आम्ही कोकणात गेलॉ होतो. तीन बाजूंनी पाण्याने वेढलेल्या एका त्रिकोणी बेटावर राहिलो होतो. मालवणपासून १०-१२ कि. मी. वर कालवली म्हणून गाव आहे. मसुरे गावी टोकळ वाडी म्हणून हे बेट आहे. माझा मोठ भाऊ तेव्हा सातवीत होता. फारच अतरंगी होता. त्याने एका दुपारी एक होडी तिचा मालक नाही हे बघून पळविली. कशी चालवितात ते पाहाणे व प्रत्यक्ष चालविणे यात फरक आहे. प्रवाहाचा वेग फार असल्यामुळे त्याला नियंत्रण करता आले नाही व तो वाहून जाऊ लगला. तेवड्यात वल्हे होडीखाली येऊन होडी उलटेल अशी स्थिती आली. तोपर्यंत मी किनाऱ्यावरून बोंबाबोंब करून मदत मिळविली व तो वाचला.

 हेच पार्क "फॉल" मध्ये तर खऱ्या अर्थाने रंगतं. यातील वृक्षराजी लाल, पिंगट, गुलाबी, पिवळ्या, जांभळ्या.. थोडक्यात निळा सोडल्यास जवळजवळ प्रत्येक रंगात नटलेली दिसेल. आणि थंडीत हिमपुष्पे ल्यालेलं सेंट्रल पार्क पौर्णिमेच्या रात्री बघावं.. चांदणं आणि बर्फ ल्यालेली झाडे इतकी प्रकाशमान भासतात.

तुमच्या नेत्रसुखाचा हेवा वाटला.

सुटलो तर नाहीच. तुम्ही देखील सुटला नाहींत. पुढील भागांची वाट पाहात आहोंत.