मोकळी मैदाने, पार्क्स ही शहराची फुफुसे आहेत हे आम्हाला केव्हा कळणार? दिसेल त्या मैदानावर विकासाच्या नावाखाली काँक्रीटचे जंगल उभारताना आपण आपली नाकपुडीच दाबत आहोत याचेही कोणाला भान नाही! निसर्गानेच शहरालगत दिलेल्या जंगलात आधी घूसखोरी करायची आणि मग त्या जंगलातील बिबळ्या मनुष्यवस्तीत आला की पुन्हा बोंबाबोंबही करायची!
ह्या अमेरिकन मंडळींच्या माणशी एक गाडी या वैयक्तिक वैभवाचे मला अजिबातच वैषम्य वाटत नाही परंतु त्यांच्या ह्या सार्वजनिक वैभवाचे जरूर वाटते.
असो, न्यू यॉर्कचे वर्णन सुरेख उतरले आहे.
पुलेशु.