पुन्हा पुन्हा केला मीच कोंडमारा माझा
झाकोळत ठेवला मी सदा तारा माझा
वाहू दिला नाही कधी मीच वारा माझा
...जरी सारे करायाची सवलत आहे !
              *  * *
सुटेलच कधीतरी पेच...जाणतो मी
मनापरी घडणार, हेच जाणतो मी
इथे माझा मीच...इतकेच जाणतो मी
...सुरू माझी माझ्याशीच मसलत आहे !!

एकदम झकास.
तारांकित भाग करून कवितेला वेगळं वळण देण्याची तुमची शैलीही फर्मास आहे.