आडनाव काही प्रमाणात जाती बद्दल माहिती देते... आठवण करून देते... म्हणून आडनावाचा त्याग केल्यास??! आज corporate जगतात सगळीकडे माणसाला preferrably नावानेच हाक मारली जाते,, ओळखले जाते ती चांगली प्रथा आहे :) ... ही प्रथा तेथे रुजण्याचे आणि "तग" धरून राहण्याचे कारण खाजगी क्षेत्रात आता आता पर्यंत आरक्षण नव्हते ! आणि मग जातीनी ओळखण्याची आणि सवलती देउन "फरक" करण्याची गरजच नव्हती :)
खरं सांगतो,, या आरक्षणामुळेच जाती खणून वर काढल्या जातात :( आरक्षणामुळे जणू काही जातींचे गटच जोपासले जात आहेत. जो तो आपला जात भाई हेरून ठेवतो आणि नकळत (आरक्षण न मिळालेला आरक्षण मिळालेल्या जातीसमुहाचा किंवा आरक्षण मिळालेला,, आरक्षणात वाटेकरी असलेल्या ) दुसऱ्या जातीचा द्वेश करू लागतो
अपेक्षित असलेला सामाजिक समानतेऐवजी संकुचित प्रव्रुत्तीचाच प्रादुर्भाव आरक्षणामुळे होतोय आणि अपेक्षित जाती निर्मुलनाच्या चिंधड्या उडत आहेत