आदित्य.. आरक्षण हा विषय इथे अनेकदा येवून गेलाय.. इथे संदर्भ वेगळे आहेत.. या विषयावर अभ्यासपूर्ण मतं द्या.. अथवा राज ठाकरे शरद पवारांच्या सल्ल्यानुसार महाराष्ट्र फिरून आले तसे फक्त एक दोन जिल्हे फिरून या....
संदिपराव व इतरांची मते चांगली आहेत.. जात हे एक आस्तित्वाच्या परिमाणांपैकी एक परिमाण आहे.. आस्तित्वाची धडपड नैर्सगिक असते व तिला त्यासाठी समुहाचा आश्रय सुरक्षित वाटतो. जगात प्रत्येक प्रदेशात ही परिमाणं, आस्तित्वं, धडपड व समुह दिसतोच. उपाय माहित नाहीत पण प्रयत्न म्हणजे आपल्या पुढील पिढीवर योग्य संस्कार करणे, इतिहास, भूगोल, संस्कृती योग्य प्रकारे पोचवणे, ज्यायोगे आकस कमी होउन पाटलांना, रॉय याना अभिप्रेत काही टक्के नक्की घडेल याची खात्री देता येईल.