जळमटं झटकणे, उलथापालथ वगैरे स्वच्छता मोहीम आवडली.

उंबऱ्याच्या आतमध्ये सवे घेऊन येणाऱ्या
विकारांनी बरबटलेल्या
सहा पायांच्या खेकड्याला
संयमाच्या कुंच्याने
बाहेरच लोटायला हवं------
---घर कसं स्वच्छ हवं
------मन कसं स्वच्छ हवं
घासून पुसून लख्ख हवं"

हे सगळ्यात जास्त आवडले; पण खेकड्याची उपमा/रूपक तितकीशी पटली/ले नाही. सहा पायांचा खेकडा म्हणजे षड्रिपू अपेक्षित आहेत काय? पण मग खेकडा का? की खेकडा मनोवृत्तीकडे निर्देश आहे? विचार करण्याजोगा मुद्दा वाटतो. असो.

पुढील लेखनासाठी अनेकोत्तम शुभेच्छा.