नमस्कार वैभव, प्रयत्नवादी असलेले नेहेमीच बरे हे अगदी मान्य आहे.

...पण जर फक्त प्रयत्नवादी असले आणि तो व्यक्ती समजेल की मी जे ठरवतो ते करू शकतो. मला अडवणारे कुणी नाही. मग तो वाईट कृत्ये करायला सहज धजावेल. असे व्हायला नको. म्हणून तरी कमीत कमी देव नामक चांगुलपणाच्या शक्तीवर विश्वास हवा. नाहितर मग अराजक माजेल. दुसऱ्या भाषेत सांगायचे झाले तर, देव म्हणजेच आपल्या सगळ्या सजीव प्राण्यांमध्ये असलेली चांगुलपणाची शक्ती, (आपला आतला आवाज त्याला तुम्ही म्हणू शकता), जी आपल्याला वाईट कृत्य करण्यापासून रोखते. तेव्हा अशा शक्तीवर विश्वास हवाच. आपले कोणतेतरी श्रद्धास्थान असलेच पाहिजे. मग ती श्रद्धा स्वत: मध्ये असलेल्या चांगले काम करण्यासाठीच्या ईच्छाशक्ती वर फक्त असली तरी पुरेशी आहे. फक्त कोणी ती श्रद्धा प्रतीकाच्या स्वरूपात देवामध्ये ठेवते. पण श्रद्धास्थान हवे.

...अर्थातच ती अंधश्रद्धा नसावी. समाजात काही लोक असे असतात की, दिवसभर लोकांना लुटतात, भरपुर पाप करतात, घरातल्या लोकांशी नीट वागत नाहीत आणि रोज अगदी नियमानुसार देवाची मंदिरात जावून किंवा देवघरात पूजा करतात. ते पूर्णपणे व्यर्थ आहे. हा शुद्ध ढोंगीपणा झाला. अशी देवपूजा काय कामाची?