सर्व वाचकांचे, प्रतिसाद देणाऱ्यांचे मन:पूर्वक आभार.

सुधीरराव,
आपला होडीचा अनुभव रोचक आहे  . बाकी अश्या कोकणातल्या बेटांवर राहण्याचा अनुभव आम्हा शहरातच जन्मल्या वाढलेल्यांसाठी विरळा आहे. तेव्हा तिथेल्या निसर्गाचं, प्रसंगांचं वर्णन शब्दबद्ध केलंत तर वाचायला आवडेल

सुमीत,

विकासाच्या नावाखाली मुंबई गलिच्छ करत आहेत

लाख मोलाचं बोललात. सेंट्र्ल पार्कचे फोटो बरेच आहेत पण मला आवडणारे "प्री-फॉल" काळातील फोटो शेअर करीन. तुमचा विरोपाच पत्ता व्यनिने कळवा.

सुनीलशेठ,

ह्या अमेरिकन मंडळींच्या माणशी एक गाडी या वैयक्तिक वैभवाचे मला अजिबातच वैषम्य वाटत नाही परंतु त्यांच्या ह्या सार्वजनिक वैभवाचे जरूर वाटते.

हे अगदी मनातील बोललात. मलाही कोणाच्याही वैयक्तीक वैभवाबद्दल कधीच काही वाटत नाहि, पण इकडील सार्वजनिक वैभव आणि सुविधा पाहिल्या की मात्र मला तरी यांचा हेवा वाटतो.

मीराताई,

प्रतिक्रियेबद्दल आभार. माझा कॅमेरा साधाच आहे. फक्त मी मोजके फोटो ट्रायपॉड लाउन काही फोटो काढतो. ते न हलल्याने चांगले येतातच. माझं कसब कमीच  . (बाकी हातात कॅमेरा धरून काढलेले फोटो सगळ्यांसारखेच येतात  )

बाकी केवडा, सुप्रिया,समशेर, कुशाग्र सगळ्यांचे प्रोत्साहनपर प्रतिक्रियांबद्दल अनेक आभार!!

-(आभारी) ऋषिकेश