साताऱ्यातील एका दंतवैद्यांचा एक वेगळा अनुभव. माझ्या दातांची (वार्षिक) चाचपणी करून, एका दाताची डागडुजी करून दंतवैद्यांनी फी सांगितली. बाहेर येऊन मी ती दिली. थोड्या वेळाने (मी माझ्या वडिलांची वाट पाहत थांबलेली असताना) एका खेडूताच्या बराच वेळ चाललेल्या कामानंतर त्याने दिलेली फी दिसली. माझ्या फीच्या १/५!! आधी मला राग आला खरा, पण नंतर पटले.
सर्वसाधारणपणे, वैद्यकी हा इतर व्यवसायांसारखा एक व्यवसाय आहे असे मान्य केले म्हणजे जास्त तक्रारींना वाव राहणार नाही.