"चल काढ तुझासुद्धा
पसारा आवरायला
विचारांची फोलपटं, सूडाची जळमटं
उंबऱ्याच्या आतमध्ये सवे घेऊन येणाऱ्या
विकारांनी बरबटलेल्या
सहा पायांच्या खेकड्याला
संयमाच्या कुंच्याने
बाहेरच लोटायला हवं------
---घर कसं स्वच्छ हवं
------मन कसं स्वच्छ हवं
घासून पुसून लख्ख हवं"

........एखाद्या संताच्या ओव्या मॉडर्न शब्दात मांडल्यावर अश्याच होतील :) मस्त आहे....आवडला ही कविता!