आदित्यभाऊ, मला तुम्हाला कसलेही मार्गदर्शन करायचे नाही पण प्रत्येकाची मतं नेहमीच परिपक्व होतच असतात... आपल्या सगळ्यांपुढे बरेच प्रश्न आहेत.. भ्रष्टाचार, दहशतवाद, जातीयता वगैरे...
समुहाचा, समाजाचा विकासाचा वेग हा त्यातील सर्वात धीम्या एककावर अवलंबून असतो, हेच सत्य आहे.. आणि त्याचा आपण सर्व रोजच अनुभव घेत आहोत.
म्हणूनच प्रत्येकवेळी मी बदल आणण्यासाठी आपण काय करतो असे विचारतो. प्रत्येकवेळी समाजसुधारक किंवा प्रेषिताची वाट बघण्यात अर्थ नसतो.. 'मनोगत' हे माध्यम चर्चेचे आहे व त्यातून एक दिशा ठरली पाहिजे व आपण सर्व व्यैयक्तिक कृतीसाठी तयार व्हायला पाहिजे, तरच ह्या व्यासपीठाचा योग्य उपयोग झाला असे मानता येईल.. नाही का?
पुश्कराजसाहेब, तुम्हाला नक्की कोणाचे मत पटले ते नाही हो कळले......