या प्रकाराचा नेमका अर्थ कळाला नाही. संघ एकाच्या मालकीचा म्हणजे नेमके काय होणार? याहून महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे पैसे कुणाच्या खिशातून कुणाच्या खिशात जाणार आहेत? यात सहभागी झालेल्या अभिनेत्यांची यादी बघता त्यांच्याकडून दुसरी काही अपेक्षा करणे चुकीचे आहे. (करण जोहरचे नाव दिसले नाही त्याची रुखरुख वाटते आहे.)  कदाचित हे लोक गरजू संस्थांना दान वगैरे देतही असतील, पण कोट्यावधी डॉलर असे उधळण्यापेक्षा बर्‍याच योग्य ठिकाणी खर्च केले जाऊ शकतात. अशा वेळी जॉन रॉकफेलरसारख्यांचे उदाहरण आठवते. या एकेकाळच्या जगातील सर्वात श्रीमंत माणसाने आपल्या पहिल्या पगारापासूनच काही भाग दान करायला सुरूवात केली. त्याची परिणती रॉकफेलर फाउंडेशन या त्यांच्या संस्थेमध्ये झाली.

हॅम्लेट