हे संघ विकत घेण्यासाठी खर्च केलेले करोडो रुपये वसूल करण्याचा मार्ग काय? यांचेच आपापसात सामने खेळवले जाणार काय? महागडी तिकिटे काढून ते सामने बघणार तरी कोण? दुसऱ्या देशांविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यांबाबत भारतीयांचे क्रिकेटप्रेम अति असेलही, पण या संघांचे आपसातले सामने पाहण्यात कुणाला रस असेल असे वाटत नाही.