अप्रतिम लेखन. तुमचा 'अमर्यादित आनंद' वाचताना पदोपदी जाणवत होता.
' माणूस जिवंत आहे रे बाबा.....!!! ' याची प्रचिती अशी बरेच वेळा येते. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आता 'ई-मदत' वेळेत मिळणे शक्य झाले.

'देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावेत  ..' ही विंदांची कविता आठवली. प्रत्येकाने या अमर्यादित आनंदाचा अवर्णनीय अनुभव घ्यावा असे वाटले. त्यासाठी फक्त जरा 'मी' च्या बाहेर पडावे लागेल इतकेच.