आपल्या लेखाच्या शेवटच्या परिच्छेदात आपण २४ तास बातम्या देणाऱ्या वाहिन्यांच्या विरोधात तक्रारीचा सूर काढल्यासारखे वाटते. मग आपले काय म्हणणे आहे? ह्या वृत्त-वाहिन्यांनी आपल्या देशाची प्रतिमा बिघडू नये म्हणून खोट्या बातम्या द्याव्यात? अमेरिकेतल्या वृत्त वाहिन्या इराक युद्धाच्या मिळमिळीत आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या देतात तसं?
भ्रष्टाचार आणि लोकसंख्या हे भारतापुढील सर्वात गहन प्रश्न आहेत, पण त्याविषयीचे सत्य लपवून हे प्रश्न सुटणार नाहीत.