तुमचे म्हणणे बरोबर आहे...पण...
मला असे म्हणायचे होते की... फक्तच भ्रष्टाचार जगासमोर का आणावा या वाहिन्यांनी? डॉन लोकांच्या मुलाखती, क्रिकेटपटूंच्या आणि अभिनेत्रींच्या जोड्या लावत बसण्यापेक्षा कुठेतरी एखादा शिक्षक चांगले अभिनव कार्य करत असेल तर तेही दाखवायला हवे.
नवीन वर्षाच्या मद्य-धुंद पार्ट्या दाखवतात, त्याच बरोबर कुणी नव वर्षानिमित्त विधायक कार्य केले तेही दाखवा.
नाही, म्हणजे भारतात भ्रष्टाचाराव्यतिरिक्त काही दुसरे उरलेच नाही, अशी प्रतिमा नको निर्माण व्हायला.