हॅनसीट च्या टेंपोला बजाज टेंपोच्या कामगारांत ढेकण्या टेंपो म्हणत. ते खरे की खोटे किंवा तसे का म्हणत ते माहीत नाही. पुण्याच्या गल्लीबोळांतल्या कोल्ड्रिंक हाऊस मध्ये सोडावॉटर, पिबोला, बा-जल, रिमझिम, किस्मत, गोल्डस्पॉट इत्यादी पेयांची वाहतुक असल्या ढेकण्या टेंपोंमधून होत असे. त्यातून प्रवासी वाहतुक कोणी करायला बघत असेल हे पटणे शक्य नव्हते. पुढे  औरंगाबादेत अशी वाहतुक दिसली आणि खात्री पटली.