ह्या यादीत लॅंब्रेटा रिक्शा राहून गेल्यासारखी वाटते. बजाजची रिक्शा आणि लॅंब्रेटाची रिक्शा ह्यात एक महत्त्वाचा फरक (निदान तेव्हा तरी) होता तो असा की बजाजच्या (म्हणजेच व्हेस्पाच्या) रिक्शाच्या मागच्या दोन चाकांमध्ये डिफरन्शियल नव्हता. लॅंब्रेटाच्या रिक्शात ही सुधारणा केलेली होती. शिवाय बजाजची रिक्शा (निदान तेव्हा तरी) मागे घेणे सहज शक्य नसे. ती ढकलावी लागे. पुढे रिक्शावाल्याला खाली उतरून मागे काहीतरी खुडबुड करावी लागे. मगच ती मागे नेता येत असे. लॅंब्रेटा रिक्शात ही अडचण नव्हती असे कळते. (चूक भूल द्यावी घ्यावी)
दोन रिक्शावाले समोरासमोर आले की रिक्शा मागे घ्यायला लागणे अपमानाचे का समजले जाते ते ही तांत्रिक अडचण समजल्यावर समजले!
बरशेन (आता भारतगॅस) च्या पिंपांची वाहतुक करण्यासाठी लॅंब्रेटाच्या रिक्शा होत्या. (तेव्हा बजाजच्या रिक्शात सामान वाहतुकीची व्यवस्था नव्हती) (पुण्यात प्रवासी वाहतुकीसाठीही लॅंब्रेटाच्या रिक्शा होत्या असे आठवते.)