बजाज आणि लॅंब्रेटाच्या तीनचाकींमध्ये आणखी एक फरक होता असे मला वाटते. बजाजची रिक्शा सुरू करताना रिक्शावाल्याला तरफ खालून वर खेचावी लागे. ते फार कष्टाचे होते. लँब्रेटाच्या रिक्शात मात्र स्कूटरप्रमाणे लाथेने तरफ खाली ढकलावी लागे, ते सोपे होते असे वाटते. चूभूद्याघ्या.