भारतातील जनतेत व त्यांच्या संस्कृतीत एकजिनसीपणा नाही हेही येथील गरीबीचे कारण असू शकते.
जगातील 'पुढारलेल्या' बहुसंख्य देशांत एकजिनसीपणा आढळून येतो, उदा. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, जपान, स्कॅंडिनेव्हियातील देश, अगदी चीनसुद्धा.
या उलट जेथे जेथे गरिबी आहे तेथे तेथे एकजिनसीपणाचा अभाव आहे - भारत, मध्य व दक्षिण अमेरिकेतील बहुसंख्य देश, बाल्कन देश, आग्नेय आशिया, आफ्रिकेतील अनेक देश, इ.
फ्रान्स, इटली, इंग्लंड ही अशी उदाहरणे आहेत जेथे एकजिनसीपणा कमी होताच सुबत्ता कमी व्हायला लागली आहे.
अर्थात, एकजिनसीपणा नसणे हे गैर नाही, पण वरील उदाहरणे पाहून एक साचा (पॅटर्न) असल्याचे जाणवते.